बुर्किना फासोचे ‘शैतानी लष्कर’

    14-May-2025
Total Views | 26

Burkina Faso West African country that has been experiencing instability in recent years due to terrorist attacks, non-state armed groups, ethnic conflicts
 
बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील देश, जो गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ले, गैरसरकारी सशस्त्र गट आणि जातीय संघर्षांमुळे अस्थिरता अनुभवतोय.
 
2022 साली या देशातील दोन सत्तापालटांमुळे जवळजवळ अर्धा भाग सरकारी नियंत्रणाबाहेर गेला. सध्या देशात लष्करी राजवट असून, लष्करी दलांवर सामान्य नागरिकांच्या हत्येचेही आरोप करण्यात आले आहेत. इस्लामिक दहशतवादी गटांनी येथील अनेक गावांवर हल्ला करून शेकडो नागरिकांची हत्या केली. सदर हत्याकांड विशेषतः उत्तरेकडील आणि पूर्वेकडील सीमावर्ती भागांत घडले. सरकार व सैन्यावर या हत्याकांडांचा ठपका ठेवण्यात आला. धर्मिक दहशतवादी गटांचे वाढते वर्चस्व, जातीय आणि जमिनीसंबंधी वाद, राजकीय अस्थिरता व लष्करी राजवट, सुरक्षा दलांची अनियंत्रित कारवाई ही हत्याकांडाची काही संभाव्य कारणे.
 
यापूर्वी आफ्रिकेतील नायजेरियामध्ये 62 हजार ख्रिश्चनांच्या हत्याकांडाने सारे जग हादरून गेले होते. त्यानंतर सध्या आणखी एक आफ्रिकन देश असलेल्या बुर्किना फासोमध्ये नागरिकांच्या हत्याकांडाच्या बातम्या समोर येत आहेत. इथे देशाच्याच सैन्याने 130 हून अधिक नागरिकांची कत्तल घडवून आणली. हे हत्याकांड बुर्किना फासोचे सरकारी सैन्य आणि सहयोगी सशस्त्र गटांकडून करण्यात आले. मानवी हक्कांसाठी कार्यरत अमेरिकन स्वयंसेवी संस्था असलेल्या ‘ह्युमन राईट्स वॉच’च्या अहवालानुसार, ही घटना मार्चमध्ये घडल्याचे म्हटले जाते. या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले लोक फुलानी मुस्लीम समुदायाचे आहेत. फुलानी मुस्लिमांवर अनेकदा इस्लामिक दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा आरोप केला जातो. तथापि, फुलानी समुदायाचे लोक ही बाब नाकारतात. वास्तविक, बुर्किना फासोमध्ये फुलानी मुस्लीम हा एक मोठा भटक्या गुरे चरवणार्‍यांचा समुदाय आहे, जो अनेक आफ्रिकन देशांमध्ये विखुरलेला आहे. या समुदायावर अनेकदा इस्लामिक दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय घेतला जातो. परंतु, सर्व फुलानी लोक दहशतवादी असतीलच, असेही नाही.
 
मुळात बुर्किना फासोची समस्या अशी की, तिथे इस्लामिक दहशतवाद शिगेला पोहोचलेला. देशाचा सुमारे 40 टक्के भाग ‘अल कायदा’ आणि ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी व्यापलेला आहे. ते पश्चिम आफ्रिकेतील साहेल प्रदेशात खूप सक्रिय आहेत. असा दावा केला जातो की, देशाचे लष्करी नेते या दहशतवादाचा सामना करण्याचे आश्वासन देतात. परंतु, यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा नरसंहार झाला आणि लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. ‘एचआरडब्ल्यू’च्या अहवालानुसार, या आठवड्याच्या शेवटी अनेक दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये लष्करी अधिकार्‍यांचे बळी गेले. गेल्या महिन्यांतच इस्लामिक दहशतवाद्यांनी लष्कराला मदत केल्याच्या आरोपाखाली किमान 100 लोकांना ठार मारले. बुर्किना फासो पूर्वी फ्रेंच वसाहत होती.
 
पण, त्यानंतर ती त्यापासून वेगळी झाली आणि आता इस्लामिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी हा देश रशियाकडे वळला. संयुक्त राष्ट्र, मानवाधिकार संस्था आणि ‘इस्लामिक सहकार्य संघटना’ (ओआयसी) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी अशा हत्याकांडांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. फुलानी समुदायावर झालेल्या हत्याकांडासारख्या घटना धार्मिक, जातीय आणि राजकीय संघर्षांचे गुंतागुंतीचे स्वरूप दर्शवतात. अशा घटनांमुळे केवळ स्थानिक नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आफ्रिकेतील शांततेवर परिणाम होतो. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जिबोसारख्या शहराला लक्ष्य करणे हे एक संकेत आहे की, ही संघटना आता देशात सहजपणे हालचाल करू शकते.
 
येथील इस्लामी कट्टरपंथी गट पाश्चिमात्य शिक्षणाच्याही विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी अनेक शाळांवर हल्ले केले. 2023 सालापर्यंत तीन हजारांपेक्षा अधिक शाळा बंद झाल्या. बुर्किना फासोतील या सगळ्या वाढत्या घटनांमुळे येथील 20 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर झाले आहे. बुर्किना फासोमध्ये इस्लामिक दहशतवाद फक्त सुरक्षेची नव्हे, तर मानवी हक्क, शिक्षण आणि विकासाच्या मूलभूत गोष्टींचाही घात करत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी राजकीय स्थैर्य, लोकसहभाग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यही तितकेच अत्यावश्यक आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121