अखेर १५ मेपर्यंतची बंदी उठवली! युद्धविरामानंतर आता भारतातील ३२ विमानतळांवरुन नागरी उड्डाण पुन्हा सुरु

    12-May-2025   
Total Views |

India Pakistan conflict Govt allows civil flights to operate as 32 shut airports reopen
नवी दिल्ली : (Govt allows civil flights to operate as 32 shut airports reopen) भारत- पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील ३२ विमानतळे १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युद्धविरामानंतर आता ही बंदी आता उठवली असून लवकरच विमानतळे नियमित नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
भारताने १५ मेपर्यंत पहाटे ५.२९ वाजपेर्यंत ३२ विमानतळे तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली होती, असे भारताच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या नोटिस टू एअरमनमध्ये (NOTAMS) सांगितले होते. मात्र, सोमवारी सकाळी तात्काळ प्रभावाने हे NOTAM रद्द करण्यात आले आहेत आणि लवकरच विमानतळांवरून नियमित उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
 
"१५ मे २०२५ रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याची सूचना जारी करण्यात आली आहे. ही विमानतळे आता तात्काळ प्रभावाने नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी उपलब्ध आहेत असे कळविण्यात येत आहे. प्रवाशांनी थेट एअरलाइन्सकडून विमानाची स्थिती तपासावी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइनच्या वेबसाइटचे निरीक्षण करावे", असे एअरलाइन्स प्राधिकरणाने (एएआय) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\