एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला खिंडार!

    30-Apr-2025
Total Views | 51
 
Shinde & Thackeray
 
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला संघटिका मिनाक्षी शिंदे, माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील, ठाणे सचिव बाळा गवस यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
 
ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाचे उप विभागप्रमुख प्रितम राजपूत, उप विभागप्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखाप्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबतच शाखाप्रमुख संजय कदम, स्वप्नील नेवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडीलकर, आदित्य पंडित, यश सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नेवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव हेदेखील शिवसेनेत दाखल झालेत.
 
"अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवरही भगवा डौलाने फडकेल," असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

भुयारी मार्ग पुलाची क्षती झालेली नाही : एमएसआरडीसी समृद्धी महामार्गावरून सुरक्षित वाहतूक सुरु हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील इगतपूरी ते आमणे या ७६ किलोमीटरचा चौथा टप्पा दि.५ जून रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ६७०/६८० मध्ये भुयारी मार्ग पूलावर कॉक्रीट पृष्ठभागावर २५ मी.मी.जाडीचा डांबरी चर देण्यात आलेला आहे. दि. २४ जून रोजी मुसळधार पावसामुळे ७ ठिकाणी डांबरी पृष्ठभाग निघून खड्डे पडले होते. या खड्यांचे एकूण क्षेत्रफळ साधारण १ चौ.मी. होते. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121