मुंबई, दि. २९ : (Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी वडाळा, मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. एस. नटराजन, डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल, मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपालांनी उपस्थितांना संबोधित करताना नेत्रदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. आपण स्वतः कुटुंबीयांसह नेत्रदान करण्याचा संकल्प केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. झारखंड येथे राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अनेक लोकांकडून नेत्रदानाची प्रतिज्ञा करवून घेतली होती, यंदा पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करवणार आहोत, या दृष्टीने अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी संकल्प करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. तसेच आधुनिक नेत्र रुग्णालयांना आदिवासींच्या हितासाठी ग्रामीण आणि आदिवासी भागात नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. राज्यपालांनी डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलला एक फिरते युनिट तयार करून देशभरातील गरीब आणि गरजूंना आधुनिक नेत्र उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रुग्णालयात ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा ३१ मेपर्यंत उपलब्ध असणार आहे.
"हे परिवर्तन म्हणजे जागतिक दर्जाची नेत्रसेवा देण्याच्या आपल्या ध्येयातील एक मोठा टप्पा आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याची, नेत्रचिकित्सा क्षेत्रातील पुढील पिढीच्या नेतृत्वाला प्रशिक्षण देण्याची आणि नेत्रआरोग्य क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून आपली परंपरा पुढे नेण्याची क्षमता आणखी बळकट झाली आहे."
- पद्मश्री डॉ. एस. नटराजन, वैद्यकीय संचालक (आदित्य ज्योत आय हॉस्पिटल)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\