मुंबई, नालासोपाऱ्यात जिहाद्यांकडून पाकिस्तानचे समर्थन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवणाऱ्या हिंदूंना या देशद्रोही गुंडांनी अडवत धमक्या दिल्या. तसेच पाकिस्तानचा झेंडा निदर्शकांकडून खेचून घेण्यात आला.
याविषयी माहिती देताना भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, “मी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी या परिसराचा दौरा केला. स्थानिक नागरिकांनी मला सांगितले की, ऑरेंज हाइटस (नालासोपारा प.) सोसायटीच्या आवारात खुलेआम नमाजपठन केले जाते. परंतु, हिंदूंनी आरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी सोसायटीमध्ये जात असताना, नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास वळवी यांनी मला थांबवले. मी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी फक्त दोघांना जाऊ देईन, असे उद्धटपणाचे उत्तर दिले आणि अधिकारांचा दुरुपयोग केला”.
“ऑरेंज हाइटस या इमारतीत ६ विंग आहेत. तेथील काही मुस्लीम धर्मियांनी एकत्र येत अनधिकृत मशिद बांधली, भोंगे लावले. मी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी आता हे भोंगे काढले. पहलगाम घटनेचा निषेध करणाऱ्या लोकांना येथील गुंडांनी, देशद्रोह्यांनी अडवले आणि धमक्या दिल्या. पाकिस्तानचा झेंडा निदर्शकाकडून खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधातही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या देशद्रोह्यांना तात्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये अनधिकृत मशिद आणि भोंगे लावणाऱ्या व्यक्तींची बाजू घेणाऱ्या, देशद्रोही लोकांचे संरक्षण करणाऱ्या आणि आमच्या सारख्या लोकांना सोसायटीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध लावणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास वळवी यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.