अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात 'ऋणानुबंध@२५'चे आयोजन
23-Apr-2025
Total Views |
मुंबई : अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात 'ऋणानुबंध@२५'चे आयोजन करण्यात आले. वर्ष २०००च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन शाळेचे 'ऋणानुबंध' कृतज्ञतेच्या सामाजिक बांधिलकीने जपले.
कृतज्ञता सत्कार, गुरूंची आशीर्वचने, कविता, गाणी अशा अनेक आनंदक्षणांनी हा सोहळा हृदयस्पर्शी झाला. विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया लटके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नंदा धुमाळ, माजी मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका यांच्यासह ३० ज्येष्ठ शिक्षक आणि कर्मचारी यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला.
आज आमचे माजी विद्यार्थी आम्हाला भेटायला येतात आणि सांगतात आम्ही या पदावर काम करतो. खरोखर त्या मुलांपेक्षा जास्त अभिमान आम्हाला त्यांचा वाटतो. आजच्या आमच्या मुलांसाठी आमचे माजी विद्यार्थी त्यांचे आदर्श आहेत. वेगळे आदर्श प्रस्थापित करण्याची गरजच नाही. मातृभाषेतून मुलांचा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास होतो, हे जगभरातील अनेक राष्ट्रे ज्यांनी मातृभाषेची कास धरली आहे, त्या सर्व राष्ट्रांनी हे सिद्ध केलेले आहे.' असे विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया लटके यांनी सांगितले.