डॉ. इंदुराणी जाखड पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी

    02-Apr-2025
Total Views |
 
Dr Indurani Jakhar is new District Collector of Palghar
 
मुंबई : ( Dr Indurani Jakhar is new District Collector of Palghar ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारिपदी करण्यात आली आहे.
 
याबाबतचा शासननिर्णय मंगळवार, दि. 1 एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी निर्गमीत केला. मनोज रानडे हे सध्या पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची नवनियुक्ती अद्याप प्रतीक्षेत आहे.