उत्तर प्रदेशात लग्नाच्या वरातीदरम्यान फटाके फोडल्याने कट्टरपंथींकडून हल्ला
07-Mar-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरात एका युवकाच्या विवाहात फटाके फोडण्यावरून काही कट्टरपंथींनी विवाहातील मिरवणुकीवर हल्ला केला. यात अनेक लोक घायाळ झाली आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला घेऊन आता संबंधित गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संबंधित प्रकरण हे मुजफ्फरनगर जिल्ह्यातील तिवाती पोलीस ठाण्याच्या सैदपुर गावातील आहे. विकास कश्यपच्या विवाहाची वरात जात होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते यादरम्यान, लग्नात आलेल्या पाहुण्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदाने फटाके वाजवले. त्यावेळी एका अहिंदू युवकाच्या लाकडी पेटाऱ्याला फटाक्यांतून निघणाऱ्या ठिणगीद्वारे पेट घेतला. यावेळी घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी आग विझवली.
या प्रकरणात सरताज नावाच्या युवकाने वरातीत आनंद लुटणाऱ्या युवकांना मारहाण केली. त्याने शिवीगाळही केली. घटनास्थळी अनेक कट्टरपंथींचा जमाव जमला. त्यांनी वरातीवर हल्ला चढवला आणि काठीने त्यांना मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात अनेक लोक घायाळ झालेले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला. त्यावेळी घायाळ झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वरातीतील एकूण १२ जण घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अशातच, ग्रामीण भागात तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा फौजफाटा आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, हल्लेखोरांमध्ये ३०-४० जणांचा समावेश होता. पोलिसांनी या घटनेला घेऊन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सरताजसह इतर १४ आणि त्या व्यतिरिक्त ५० अज्ञातांचा त्यात समावेश आहे. अशातच आता पोलीस अज्ञातांच्या शोधार्थ आहेत.