रोजगारासाठी इस्त्रायलला गेलेल्या भारतीय कामगारांची सुटका

    07-Mar-2025
Total Views |

Israel
 
जेरुसलेम : इस्त्रायलमध्ये (Israel)  रोजगारासाठी काही भारतीय गेले असता, दहा भारतीय कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना काम देतो या बहाण्याने एक महिना एका गावात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी आता अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पॅलिस्टिनी कामगारांना एका महिन्यापर्यंत ठेवण्यात आल्यानंतर वेस्ट बँकच्या अल-झायेम गावात आणले होते. त्यानंतर आता त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि त्याचा वापर इस्रायलमध्ये प्रवेश करण्यात आला आहे,
 
बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी इस्त्रायलमध्ये आलेल्या कामगारांना आयडीएफ आणि न्याय मंत्रालयासोबत प्राधिकारणाच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत वाचवण्यात आले. त्यांना रोजगार मिळेपर्यंत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
 
 
 
दरम्यान, ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यानंतर हजारो पॅलिस्टिनी बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यासाठी विरोध करण्यात आला त्यामुळे निर्माण झालेली पोकळी आता भरून काढण्यासाठी इस्रायल सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून गेल्या वर्षी भारतातून सुमारे १६ हजार कामगार इस्रायलमध्ये आले आहेत.
 
दरम्यान, इस्रायलमध्ये भारतीय दूतावासाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, दूतावास हे इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. भारतीयांच्या सुरक्षेसाठी त्यांना विनंती कऱण्यात करत आहेत. इस्त्रायल आणि भारताचे संबंध चांगले असल्याने भारतीयांची सुखरूप मुक्तता झाली आहे.