होय, आम्हीच संतोष देशमुखांचे मारेकरी! सुदर्शन घुलेसह आरोपींची मोठी कबुली; नेमकं काय म्हणाले?

    27-Mar-2025
Total Views |
 
Santosh Deshmukh Sudarshan Ghule
 
बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. आपणच देशमुखांची हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
 
आरोपी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी गेले असताना संतोष देशमुख आणि त्यांच्यात वाद झाला. त्याच दिवशी आरोपी प्रतिक घुलेचा वाढदिवस असून त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. याच रागातून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याची कबुली सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिल्याची माहिती आहे. आरोपींच्या कबुलीमुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? -  नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचे लाभार्थी! किरीट सोमय्यांकडून गुन्हा दाखल
 
बुधवार, २६ मार्च रोजी बीड जिल्हा सत्र न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम मांडला. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचे निकम यांनी न्यायालयात सांगितले.