मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    21-Mar-2025
Total Views | 42

Woman who accused Jaykumar Gore arrested in extortion Case
 
मुंबई : (Woman who accused Jaykumar Gore arrested in extortion Case) राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी एक कोटींची खंडणी घेताना रंगेहात पकडले. मंत्री गोरे यांनी आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचे महिलेने सांगतले होते.
 
संबंधित महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागितली. त्यातील एक कोटी घेत असताना सातारा पोलिसांनी अटक केल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान, या महिलेने जयकुमार गोरेंवर अश्लील फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात अधिवेशना दरम्यान विरोधकांनी गोरेंचा राजीनामा मागितला होता. परंतू जयकुमार गोरे यांनी हे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
 
नक्की प्रकरण काय?
 
२०१६ मध्ये गोरेंवर संबंधित महिलेने आरोप केले होते. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गोरेंनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला. आरोप करणाऱ्या महिलेला एक निनावी धमकीचे पत्र आल्यावर तिने पुन्हा एकदा गोरेंवर आरोप केले होते. या प्रकरणाचा निकाल २०१९मध्येच लागला असून गोरे यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121