कुष्ठपीडितांचे अनुदान वाढविल्याबद्दल राज्य शासनाचे आभार: राम नाईक

    20-Mar-2025
Total Views | 10

Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik 
 
मुंबई: ( Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik ) राज्यातील कुष्ठपीडितांना दरमहा मिळणारे अनुदान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रु. 2,000/- वाढवून रु. 6000/- करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व कुष्ठपीडितांसाठी दीर्घकाळ लढणारे श्री राम नाईक यांनी आभार मानले आहेत. काल विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य शासनाने कुष्ठपीडितांचे अनुदान सहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला असल्याची माहिती दिली. त्यावर सदर प्रतिक्रिया श्री राम नाईक यांनी व्यक्त केली आहे.
 
देशभरातल्या कुष्ठपीडितांच्या सक्षमीकरणासाठी श्री नाईक गेली अनेक वर्षे सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने कुष्ठपीडितांना दरमहा निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय वर्ष 2008 मध्ये घेतला होता. आता हा निर्वाह भत्ता वाढविण्याची गरज असल्यामुळे त्यासाठी श्री राम नाईक तसेच राज्यातील विविध कुष्ठ पीडित संस्था मागणी करत होत्या. गेल्याच महिन्यात कै.बाबा आमटे यांच्या 'महारोगी सेवा समिती'च्या अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये ही श्री राम नाईक यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला होता. त्यावेळी हे अनुदान वाढविण्याचे आश्वासन तिथे उपस्थित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 'बोले तैसा चाले' असे महायुतीचे राज्य आहे असे म्हणून प्रत्यक्षातही अनुदान वाढीचा निर्णय झाल्याबद्दल श्री नाईक यांनी अतीव समाधान व्यक्त केले.
 
कुष्ठरोगामुळे येणारे अपंगत्व आणि विद्रुपता यामुळे कुष्ठपीडितांना उदर निर्वाहासाठी कोणताही व्यवसाय करणे अशक्यप्राय होते, भीक मागण्या वाचून पर्यायात उरत नाही आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवन जगता येईल एवढे अनुदान दिले गेले पाहिजे, अशी श्री नाईक यांची मागणी होती. श्री नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना तेथील कुष्ठपीडितांना पंतप्रधान व मुख्यमंत्री आवास योजनेच्या समन्वयाने पाणी, गॅस आदी सोयींनीयुक्त घरे बांधून देण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही योजना मंजूर झाली असून पनवेल येथे सध्या कुष्ठपीडितां साठी घरे उभारण्याचे काम सुरू आहे. राज्यभरातील सर्वच कुष्ठपीडितांना लवकरात लवकर घरे मिळतील, अशी आशाही श्री नाईक यांनी व्यक्त केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121