आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

    20-Mar-2025
Total Views | 24
 
Bangladesh
 
सांगली : देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी (Bangladesh) घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला.
 
बनावट कागदपत्रांचा वापर करत तो काही दिवस एका लॉजमध्ये वास्तव्य करत होता. यासंबंधित घटनेची माहिती सांगली पोलिसांना समजताच पोलीस अधिकारी संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. संबंधित प्रकरणावर सांगलीचे उपनिरीक्षक संजय पोवार यांनी संबंधित गावातमध्ये गस्त घालत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याच्या चौकशीला सुरूवात करण्यात आली असून आपण बांगलादेशातील असल्याचे त्याने मान्य केले आहे.
 
 
 
तसेच घुसखोरी करणाऱ्या शेखने आधारकार्ड बनवले होते आणि त्यावर एबीसी नजदीक, आंबेडकर चौक, मुनरीका गाव, जेएनयू, दक्षिण-पश्चिम असा पत्ता नमूद करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना संबंधित शेख हा घुसखोर असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने आपण बांगलागदेशी असल्याची खरी ओळख सांगितली असून आपण ढाक्यातून आल्याचे सांगितले होते.
 
त्याने अवैधपणे बांगलादेशात घुसखोरी केल्याने त्यच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. बांगलादेशी असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्यावर कलम ३ (अ), ६ (अ), पारपत्र अधिनियम भारतात प्रवेश १९५०, कलम १४ अ (ब) परकिय नागरिक आदेश १९४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121