केरळात रेडिओ जॉकीची गळफास लावत आत्महत्या

    02-Mar-2025
Total Views |
 
Kerala
 
तिरुवनंतपुरम : केरळमधील (Kerala) कोचीमध्ये वनिता मित्रम वसतिगृहातील रेडिओ जॉकी ऐश्वर्या मिथिलीने आत्महत्या केली. शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला होता.
 
थ्रिक्काकारा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्याने सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान आत्महत्या केली. तिचा मृतदेह हा पंख्याला एका शालीने लटकवण्यात आला होता. वसतिगृहाच्या वॉर्डनने पोलिसांना सांगितले की, ऐश्वर्याच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला होता. त्यांचे पार्थिव कलामसेरी मेडिकल महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
 
एका वृत्तमाध्यमानुसार, ऐश्वर्या ही एका इंटर धवानी मीडिया अकादमीत रेडिओ जॉकी म्हणून सक्रिय होती. केरळ मीडिया अकादमीतून तिचे पीजी डिप्लोमाचे शिक्षण सुरू होते. तिच्या मैत्रिणीने लीनाला सांगितले की, ऐश्वर्याने तिला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान, फोनद्वारे संपर्क साधला होता. पण तिने तो फोन कॉल उचलला नाही. लीनाचा एका आठवड्यापूर्वीच अपघात झाला होता. त्यानंतर तिला आराम करण्यास सांगितला होता. त्यावेळी ती म्हणाली की, जर फोन उचलला असता तर काही तरी समजले असते. मला नाही वाटले की ती असे पाऊल उचलेल. खरं म्हणायला गेलं तर ती खूप धाडसी होती.
 
घटनेदरम्यान, ऐश्वर्याच्या डेस्कवर एक छोटीशी चिठ्ठी सापडली होती. ज्याच तिने लिहिले होते की, ती स्वत:च्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. तिने या प्रकरणात कोणालाही दोषी ठरवले नाही. तिने आपल्या बहिणीला आनंदी राहण्यास सांगितले. चिठ्ठीत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
ऐश्वर्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असायची. तिचे युट्यूबवर अनेक व्हिडिओ होते पण अलिकडेच ती अगदीच शांत होती. तिच्या मित्र-मैत्रिणींचे म्हणणे आहे की, ती पूर्वीप्रमाणे राहिली नव्हती. त्यानंतर तिचे अनेक नातेवाईक हे वसतिगृहात पोहोचले होते. याप्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत. परंतु अद्यापही आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.