भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेस युवतीची हत्या, सुटकेसमध्ये सापडले हाडांचे तुकडे
02-Mar-2025
Total Views |
चंदीगड : राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या ३० वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal Murder)यांची हत्या करण्यात आली. हरियाणा संस्कृतीशी मिळता जुळता पोषाख परिधान केल्यानंतर चर्चेत आलेल्या हिमानी रोहतक शहरातील विजय नगरच्या रहिवासी होत्या. त्यांनी वैश्य महाविद्यालयातून एमबीए आणि कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले होते.
शनिवारी १ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास समलखा बस स्थानकाजवळील रस्त्याच्या कडेला एका निळ्या सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह आढळला आहे. त्यावेळी तिचा चेहरा निळा आणि ओठांवर रक्ताचे डाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. यानंतर असे गृहीत धरले जात आहे की, हिमानीला क्रुरपणे मारहाण केली आणि नंतर ओढणीने तिचा गळा आवळण्यात आला. त्यानंतर रात्री एका निर्जणस्थळी अंधारात सुटकेस फेकण्यात आली होती.
#WATCH | Rohtak, Haryana: Visuals from outside the residence of Himani Narwal, a Congress worker whose body was found inside a suitcase near a highway in Rohtak on 1st March. Congress leaders have demanded a high-level investigation of the murder. pic.twitter.com/mHLHzXjn6f
या सर्व घटनेनंतर सकाळी त्याच सुटकेसमध्ये युवतीचा मृतदेह असल्याची बातमी समोर आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तात्काळ रोहतकमधील विजयनगर येथे असलेल्या निवासस्थानी दाखल झाले. परंतु यावेळी घर कुलूपबंद होते. यानंतर आजूबाजूला असणाऱ्या स्थानिकांकडून संबंधित प्रकरणाची पुष्टी करण्यात आली होती.
संध्याकाळी उशिरा, मृतदेह पाहिल्यानंतर मृत युवतीच्या नातेवाईकांनी पुष्टी केली. तेव्हा ती हिमानी असल्याचे समोर आले होते. दरम्यान, हिमानी कामानिमित्त सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायची. एका मोठ्या सुटकेसमध्ये असलेल्या बॅगेत तिचा मृतदेह होता आणि त्यात तिची तुटलेली हाडेही दिसून आली होती.