प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारकाच्या उभारणीसाठी शिवभक्तांची मागणी

    18-Mar-2025
Total Views |
 
Shivaji maharaj devotees demand construction of Shiv Pratap memorial at the Pratapgad fort
 
मुंबई: ( Shivaji maharaj devotees demand construction of Shiv Pratap memorial at the Pratapgad fort ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी दिनांक १७ मार्च रोजी कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रस्तावित शिवप्रताप स्मारकासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
 
कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन विभागाचा कार्यभार असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक बनवण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. काही दिवसांपूर्वीच या शिवप्रताप स्मारकात उभारण्यात येणारा अफजल खान वधाचा भव्य पुतळा तयार झाला आहे. हा पुतळा लवकरात लवकर प्रतापगडच्या पायथ्याशी स्थापन व्हावा आणि शिवस्मारकाची संपूर्ण उभारणी व्हावी अशी शिवभक्तांची मागणी आहे. शिवप्रताप जागृत करणारा हा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी लवकरात लवकर स्थापन व्हावा आणि शिवस्मारकाची संपूर्ण उभारणी व्हावी यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
 
प्रतापगड हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार आहे. याठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाणे ही महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाची बाब आहे, असे मंत्री लोढा यांनी यावेळी बोलताना सांगितले.