लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन
16-Mar-2025
Total Views |
पाटणा : जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले.
पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई केली.
धुलीवंदना दिवशी तेज प्रताप यादवने होळीचे गाणे गालये आणि बिहार पोलिसाला नाच नाहीतर निलंबित करेन अशी धमकीच दिली. त्या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तेज प्रताप यादव धमक्या देताना दिसत आहेत. त्याने दिलेल्या धमकीमुळे संबंधित पोलीस नाचू लागला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाकडे जनता बोट दाखवू लागली आहे.
Constable Deepak Kumar (bodyguard), who was seen complying with MLA Tej Pratap Yadav's instructions to dance in a public place, has now been removed, and another constable has now been deputed in place of Deepak Kumar: Office of Senior Superintendent of Police, Patna pic.twitter.com/LLbLlgXClJ
जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार संजय झा म्हणाले की, त्यांच्या पक्षाती सध्याची स्थिती काय आहे तो पक्षा कसा कार्यरत आहे याचा जरा विचार करावा. बिहारचे लोक सर्व काही पाहत आहेत. तेज प्रताप यादव यांनी आणखी एक विधान केले होते की बिहारमध्ये एकच रंग प्रचलित राहिल तो म्हणजे हिरवा रंग. यानंतर फक्त जनता दलच निवडून येईल. या विधानानंतर संजय झा म्हणाले की, २० वर्षात नितीश कुमार यांनी संपूर्ण संस्कृतीचा कायापालट केला. जेव्हा लोक मतदान करायला जातात तेव्हा ते कामाच्या आधारावर मतदान करतात. काम करणारे लोक कोण आहेत आणि त्यांनी काय काम केले यावर मतदान ठरते. त्यानंतर आता त्या रंगावरून मतदान केले जाईल.