मुंबई सेंट्रल स्थानकातील वाहतुक पूर्ववत होणार

मुंबई सेंट्रल स्थानकातील काँक्रिटीकरची कामे पूर्ण

    15-Mar-2025
Total Views |

Mumbai Central restored


मुंबई, दि. १५ : प्रतिनिधी 
मागील अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी बंद असलेले मुंबई सेंट्रल एसटी स्थानक पुन्हा सुरू होणार आहे. स्थानक काँक्रटीकरणाची कामे पूर्ण झाल्याने आता स्थानकात वाहतूक पूर्ववत होण्याचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्थानकाचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १७ मार्च पासून येथून एसटी गाड्या पुन्हा धावणार आहेत. सध्या मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या एसटी गाड्या कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि पनवेल स्थानकातून धावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निधीतून स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचा हा खर्च होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निधीतून एसटीच्या राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६०० कोटी रुपये एमआयडीसीमार्फत खर्च करण्यात येणार आहेत. सद्यःस्थितीत राज्यातील अनेक स्थानकांचे काम सुरू झाले असून, आता महाराष्ट्र वाहतूक भवन असलेल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.


मुंबई सेंट्रल स्थानक आगारातील काँक्रीटीकरणाचे काम २३ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाले होते. ते १३ मार्च रोजी पूर्ण झाले. काँक्रीटीकरणामुळे मुंबई सेंट्रल येथे पूर्ण होणाऱ्या फेऱ्या अन्य स्थानकांत वळवण्यात आल्या होत्या. आगार आणि बस स्थानक परिसरात क्राँकीटीकरणाचे काम सुरू असल्याने सेंट्रल येथून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना परळ, दादर, कुर्ला नेहरूनगर स्थानकात जावे लागत होते. हा प्रवास त्रासदायक ठरत असल्याची अनेक प्रवाशांची तक्रार होती. आता मात्र प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.