छावा"ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई १५ दिवसात ४०० कोटी पार, 'या' चित्रपटाचाही विक्रम मोडला!

    01-Mar-2025
Total Views |






मुंबई : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट छावा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आणि तब्बल दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने केवळ १४ दिवसांतच ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि प्रभासच्या बाहुबली २ च्या विक्रमालाही मागे टाकले आहे.

अप्रतिम कमाई – पहिल्या १४ दिवसांचा लेखाजोखा
चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर २२५.२८ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग घेतली. त्यानंतर आठव्या दिवशी २४.०३ कोटी, नवव्या आणि दहाव्या दिवशी मिळून ४४.१ कोटींचा गल्ला जमवला. अकराव्या दिवशी १९.१० कोटी आणि बाराव्या दिवशी १९.२३ कोटींची कमाई झाली.
तेराव्या दिवशी चित्रपटाने जवळपास २५ कोटींचा आकडा गाठला. चौदाव्या दिवशीही छावा च्या कमाईत चांगली वाढ झाली आणि अखेर चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला. आतापर्यंतच्या एकूण कमाईचा विचार करता, छावा ने ४०९.८६ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

'बाहुबली २ ' चा विक्रम मोडला!
बाहुबली २ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने ४०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी १५ दिवस घेतले होते. मात्र, छावा ने केवळ १४ दिवसांत हा विक्रम मोडीत काढला आहे.
महाराष्ट्रात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या लुकपासूनच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि प्रदर्शनानंतरही महाराष्ट्रभर प्रेक्षकांचा या चित्रपटावर अमाप प्रेम आहे.

'छावा'ची दमदार घोडदौड सुरूच!
छावा ची कमाई पाहता, हा चित्रपट ५०० कोटींच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. विक्की कौशलच्या दमदार अभिनयासह, चित्रपटाची भव्य निर्मिती आणि ऐतिहासिक कथानक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आता हा चित्रपट पुढे कोणते विक्रम प्रस्थापित करतो, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.