याची देही याची डोळा 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने अनुभवला महाकुंभमेळा, म्हणाली...
09-Feb-2025
Total Views |
मुंबई : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची जगभरात चर्चा सुरू आहे. १४४ वर्षांनी आलेल्या या मेळ्यात करोडाच्या संख्येत भक्तांनी गर्दी केली. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी देखील या मेळ्याचा लाभ घेतला. याच सेलिब्रिटींमध्ये आत्ता अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने देखील महाकुंभमेळ्याचा लाभ घेतला. प्राजक्ताने कुंभमेळ्यामधला विलक्षण अनुभव सोशल मिडीयावर विडीयोच्या माध्यमातून शेयर केला आहे.
"लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होते. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पाहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले". अश्या शब्दात प्राजक्ताने तिचा अनुभव चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर केला. तिच्या या विडियोला तिच्या मित्रांसह चाहत्यांकडून देखील चांगलाच प्रतिसाद मिळतोय.
अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटामुळे अधिक लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयातून आणि नृत्य शैलीतून तिने स्वत:ची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात पाडली. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चिकी चिकी बुबूम बूम या मराठी चित्रपटात प्राजक्ता माळी जळकणार असून या चित्रपटात प्राजक्ताची भूमिका काय असणार आहे याकडे तिच्या चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.