टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे युनिटमधून मुंबईला वीजपुरवठा सुरु

चार महिन्यांनंतर विक्रमी वेळेत रिस्टोरेशन

    08-Feb-2025
Total Views |

tata power
मुंबई,दि. ८: प्रतिनिधी टाटा पॉवरने त्यांच्या ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये युनिट ५ (५०० मेगावॅट) यशस्वीरित्या पुन्हा सुरु केले आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी केबल व्हॉल्टमध्ये आग लागली होती, ऑर्डर प्लेसमेंटच्या चार महिन्यांनंतर विक्रमी वेळेत रिस्टोरेशन करून टाटा पॉवरने ग्रीडला वीज पुरवठा सुरु केला आहे.
ट्रॉम्बे प्लांट हा १९५६ सालापासून मुंबईच्या वीज पायाभूत सुविधांचा पाया राहिला आहे. शहरातील पहिले थर्मल पॉवर स्टेशन असलेल्या या ६२.५ मेगावॅटचे कार्यान्वित होणे हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. पुढील दशकांमध्ये (१९६०-१९९७) आणखी आठ युनिट्स समाविष्ट करून या सुविधेचा धोरणात्मक रित्या विस्तार करण्यात आला. यामुळे मुंबईची ऊर्जा सुरक्षा मजबूत केली गेली आणि शहरावर याआधी ओढवलेल्या वीज-संबंधित आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरली आहे. हे युनिट भारतातील पहिले ५०० मेगावॅट क्षमतेचे बहु-इंधन निर्मिती युनिट आहे. हा एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणायला हवा कारण यामध्ये त्यावेळची विक्रमी उंचीची १५० मीटर उंच चिमणी बांधणे आवश्यक होते. ट्रॉम्बे मुंबईच्या पॉवर इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा घटक आहे.
या युनिटची एकूण स्थापित क्षमता ९३० मेगावॅट आहे. हा प्लान्ट बल्क तसेच रिटेल क्षेत्रातील विविध ग्राहकांना विश्वासार्ह वीज पुरवठा सुनिश्चित करतो. युनिट ५ व्यतिरिक्त, ट्रॉम्बेची इतर युनिट्स, कंपनीचे तीन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लान्ट्स (एकूण स्थापित क्षमता ४४७ मेगावॅट) मुंबईच्या वीज पुरवठ्याच्या स्थिरतेमध्ये योगदान देतात. हे हायड्रो प्लांट सर्वाधिक मागणी संतुलित करण्यात आणि अक्षय ऊर्जा एकत्रीकरणास समर्थन देण्यात, टाटा पॉवरच्या वैविध्यपूर्ण ऊर्जा पोर्टफोलिओ अधिक बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. युनिट ५ आता पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, कंपनीने उन्हाळ्यापूर्वी वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रणालीची विश्वासार्हता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.