म्हाडा नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी अर्जप्रक्रिया सुरु

७ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यास मुदत

    08-Feb-2025
Total Views | 17

mhada
नाशिक, दि.८ : प्रतिनिधी म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीची साठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली. इच्छुकांना या घरांसाठी ७ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. दरम्यान मंडळाने सोडतीचे वेळापत्रक जाहीर करून अर्जविक्री-स्वीकृती सुरू केली आहे. लवकरच सोडतीची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती म्हाडाने दिली आहे.
नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता २० टक्के योजनेतील या घरांसाठी इच्छुकांना अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची मुदत ६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. तर संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ मार्च रोजी दुपारी ४ पर्यंत आहे. ७ मार्च रोजी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येईल आणि १८ मार्च रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र नाशिक मंडळाने अद्याप सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्जदारांना सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121