राज्यातील घर सौरऊर्जेने झळकणार

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी महत्वपूर्ण करार; परवडणारे रूफटॉप सौर वित्तपुरवठा पर्याय मिळणार

    08-Feb-2025
Total Views |

renewable power

मुंबई, दि.८ : प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज ही अभिनव योजना आखत दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची तरतूद केली आहे. याच योजेनच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट सध्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड ही टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी आहे. या कंपनीने प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत निवासी छतावरील सौर प्रकल्पांसाठी परवडणारे वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ बडोदासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य कराराद्वारे, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा यांनी छतावरील सौर प्रतिष्ठापन सुलभ, परवडणारे पर्याय देतील.

या भागीदारीबद्दल बोलताना बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक ललित त्यागी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "भारताची नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता २००GWच्या वर गेली आहे, ज्यामध्ये सौरऊर्जा जवळजवळ १००GW आहे. ही लक्षणीय वाढ मजबूत धोरण समर्थन, वाढलेली स्पर्धात्मकता आणि गुंतवणूकदारांच्या सुसंवादामुळे आहे."

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक दीपेश नंदा, म्हणाले, "बँक ऑफ बडोदा सोबतचे हे धोरणात्मक सहकार्य भारतातील प्रत्येक घरात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या मिशनमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परवडणारे आणि सोयीस्कर वित्तपुरवठा पर्याय ऑफर करून, आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर सुलभ करण्यासाठी ग्राहकांना सक्षम बनवत आहोत. व्यक्तींना त्यांच्या उर्जेचा खर्च कमी करण्यासाठी केवळ सक्षम करत नाही तर राष्ट्राच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांमध्ये आणि हवामान बदलाचा सामना करण्याच्या प्रयत्नांमध्ये अर्थपूर्ण योगदानही देते.”