दिल्लीत मुस्लिमबहुल मतदारसंघात 'कमळ' फुललं

    08-Feb-2025
Total Views |
 
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ निकाल शुक्रवारी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झाला. निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजप २७ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आले. आम आदमी पक्षाची अवस्था फारच बिकट झाली असल्याचा कल दिसून आला. दरम्यान, २०१३ पासून सातत्याने आपले वर्चस्व असलेल्या मुस्लिमबहुल भागातही आम आदमी पक्षाला मते मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. यामागील काही कारणे आता समोर आलेली आहेत.
 
दिल्लीच्या मुस्तफाबादच्या मतदारसंघामध्ये आपचा दारूण पराभव झाला. भाजपचे मोहन बिश्त हे आपचे आदिल अहमद खान यांच्यावर विजय मिळवला आहे. काँग्रेसची मते कमी झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे सांगितले जात आहे. एमआयएमचे उमेदवार ताहिर हुसैन यांचीही मुस्लिम मतांच्या विभाजनामध्ये विभाजनात भूमिका असलेल्यांचे मानले जात आहे.
 
मुस्लिमबहुल जंगपुरा मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपचे तेजिंदर सिंग मारवाह यांनी आपचे मनीष सिसोदिया यांना मागे टाकले असून विजय मिळवला आहे. तर मनीष सिसोदिया यांनी यापूर्वीही पटपरगंजमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी मतदारसंघ बदलला. मात्र शेवटी त्याचा कोणतीही फायदा सिसोदिया यांना झाला नाही. 
 
कस्तुरबा नगर मतदारसंघातही भाजपने मुसंडी मारली असल्याचे बोलले जात आहे. नीरस बैसोया हे कस्तुरबा नगरमधून आपच्या नरेश पहेलवान यांच्याहून २५०० मतांनी पुढे होते. दरम्यान नीरस बैसोया यांनी विजय मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तसेच मुस्लिम मतांची असलेल्या चांदनी चौक मतदारसंघात आम आदमी पक्षाला आघाडी मिळते. आपचे पुरदीप सिंह साहनी  यांनी काँग्रेसच्या मुदित अग्रवाल यांना मागे टाकले आहे. त्याचप्रमाणे मतिया महल मतदारसंघात आम आदमी पक्षाला आघाडी मिळाली आहे. आम आदमी पक्षाच्या आले मोहम्मद इक्बाल यांनी असीम अहमद खान यांचा ४ हजार मतांनी पराभव केला आहे.