गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा! तीन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थींनीचे केले शारीरिक शोषण

    06-Feb-2025
Total Views | 96
 
POCSO Act
 
चेन्नई (POCSO Act) : तमिळनाडूतील के कृष्णनगरी जिल्ह्यात एका इयत्ता नववीच्या अल्पवयीन विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचे लैंगिक शोषण करणारे दुसरे तिसरे कोणीही नसून युवतीचेच शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर शिक्षा कराण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
या घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठत लेकीसोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तीन अत्याचारी शिक्षकांना आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. नराधमी अल्पवयीन विद्यार्थीनीला शौचालयात घेऊन गेले असता तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान नराधम्यांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याचे सांगितले जाते.
 
 
 
या प्रकरणाच्या अहवालानुसार, विद्यार्थी महिन्याभरापासून शाळेतच जात नव्हती. त्यावेळी मुख्यध्यापकांनी शाळेत येत नसल्याची चौकशी केली. त्यावेळी तिच्या आईने या प्रकरणासंबंधित माहिती सांगितली. त्यावेळी संबंधित मुख्यध्यापकांनी घडलेल्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करा अशी माहिती दिली. त्यानंतर ते जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे गेले. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121