नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदेडमध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे. पक्षाचे जनकल्याणाचे कार्य पुढे नेत असताना मोहनराव हंबर्डे यांचा दांडगा जनसेवेचा अनुभव कामी येईल," असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.