आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या

    28-Feb-2025
Total Views |
 
Manav Sharma suicide
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आयटी कंपनीच्या टीएसमध्ये भारती व्यवस्थापक असलेल्या मानव शर्मा (Manav Sharma suicide) यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्नीच्या छळाला कांटाळून आत्महत्या केली. मानवने गळ्यात गळफास बांधत आत्महत्या केली आहे. या घटनेसंबंधित ६.५७ मिनिटांचा व्हिडिओ बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
 
संबंधित व्हिडिओत मानवने त्याच्या आत्महत्येसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरले आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यामुळे आणि धमक्यांमुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. त्याने पुरूषांसाठी कायदे करण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला की, पुरूष खूप कष्ट करण्याच्या नादात शेवटी एकटे राहतात. त्यांच्याबाबतल कोणीही आवाज उठवत नाहीत.
 
 
 
मानवच्या वडिलांनी सांगितले की, सून मुंबईत भांडत असते, त्याच्या खोट्या गुन्ह्यांची धमकी देते. इतर परपुरूषाशी प्रेमसंबंध असेल. पत्नीला तिच्या माहेरी सोडून तो पुन्हा परत आला, पण त्याच्या सासरच्यांनी त्याला धमकावले, ज्यामुळे तो तणावात गेला. मृत मानवच्या वडिलांच्या तक्रारीत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात, मानवच्या पत्नीचेही विधान समोर आले आहे ज्यामध्ये तिने म्हटले आहे की मानवने तिला स्वेच्छेने आनंदाने घरी सोडले होते.