फसवून लग्न करून हिंदू महिलेला त्रास देणार्यावर कारवाई करा ! खा. नरेश म्हस्के यांचे पोलिसांना निर्देश
लव्ह जिहादच्या सापळ्यात आणखी एक पीडित
28-Feb-2025
Total Views |
ठाणे: (Naresh Mhaske on love jihad) एका हिंदू महिलेला फसवून तिच्याशी लग्न करीत नेपाळला परागंदा झालेल्या मुस्लीम भामट्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश खा. नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.‘खासदार आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात पीडित हिंदू महिलेच्या तक्रारीची दखल घेत खा. म्हस्के यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले. दरम्यान, ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खा. नरेश म्हस्के हे आपल्या मतदारसंघात ‘खासदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवतात.
मिरारोड येथील एका हिंदू महिलेला फूस लावून एका मुस्लीम इसमाने लग्न केले. विवाहानंतर तीन वर्षे एकत्र राहिले. मुलगा झाला आणि त्यानंतर हा इसम या महिलेला त्रास देऊ लागला. पत्नीला सोडून तो मुलासह नेपाळला पळून गेला. इकडे ये-जा करतो. परंतु, मुलाला काही आईच्या ताब्यात देत नाही. तो फार त्रास देत असल्याने याबाबत या महिलेने नवघर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाही. अखेर खा. नरेश म्हस्के यांच्या ‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमात तिने तक्रार दाखल केली. खा. म्हस्के यांनी या तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. हे प्रकरण तातडीचे समजून घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले.