पुणे अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल! तातडीने कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना
27-Feb-2025
Total Views | 37
पुणे : राष्ट्रीय महिला आयोगाने स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना एक पत्र लिहिले असून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्वारगेट डेपोमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर थांबलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून आयोगाने या घटनेचा निषेध केला आहे राष्ट्रीय महिला आयोग या प्रकरणाच्या चौकशीवर बारकाईने लक्ष ठेवणार असून आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.