संभलच्या मशिदीची रंगरंगोटी, उच्च न्यायालय आज निर्णय देणार
27-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे (एएसआय) एक पथक गुरुवारी जामा मशिदीत पोहोचले. पथकाने रंगरंगोटी आणि सजावटीचे सर्वेक्षण केले. पथकाने मशिदीची सत्यता तपासली. यानंतर तयार केलेला अहवाल न्यायालयात आज, शुक्रवारी सादर केला जाईल.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की एएसआयच्या तीन अधिकाऱ्यांनी मुतवल्लीसह संभल जामा मशिदीची तपासणी करावी आणि तिला रंगकाम आणि दुरुस्तीची आवश्यकता आहे की नाही हे तपासावे. तसेच, त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी १० वाजता न्यायालयात सादर करावा. त्यानंतरच न्यायालय रमजान सुरू होण्यापूर्वी मशिदीला रंगवण्याचे निर्देश देण्याचा विचार करेल.
न्यायालयाने असेही म्हटले आहे की रमजानपूर्वी कोणतीही कारवाई केली तर एएसआयने त्याचे व्हिडिओग्राफी करावी. न्यायालय २८ फेब्रुवारी रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करेल. जामा मशीद संभळच्या व्यवस्थापन समितीने दिवाणी पुनरीक्षणात दाखल केलेल्या लवकर सुनावणीसाठीच्या अर्जावर न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिले आहेत.