पंजाबमध्ये आप सरकारकडून बनावट आदेशाचे प्रकरण आले समोर

    27-Feb-2025
Total Views |
 
AAP
 
चंदीगड : पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अशातच पंजाबमध्ये एका आपच्या नेत्याला कोणतेही मंत्र्याचे खाते दिले नाही. मात्र, ते सुधारणा विभागाचे मंत्री म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे नाव कुलदीप धीलवाल असून संबंधित प्रकरणाची माहिती चव्हाट्यावर आली आहे. याचपार्श्वभूमीवर पंजाब सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. सोशल मीडियावर एका अधिकाऱ्याने एक पोस्ट शेअर केली होती. या आदेशानुसार, त्यांनी लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि सेवादारांशी संबंधित होता. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाशी संबंधित आदेशाची अंमलबजावणी केली.
 
 
 
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या बनावट आदेशानुसार, शालेय शिक्षण विभागाच्या संचालकांना याची माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना अर्ज केला. संबंधित पत्रकाद्वारे तुम्ही जे बदल करत आहात. त्या पत्रकात बनावट आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात अधिकृतरित्या असे काहीही एक जाहीर करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
 
शालेय शिक्षण विभागाने या संबंधित प्रकरणी बुधवारी माहिती दिली. शिक्षण अधिकाऱ्यांनी बनावट आदेशांच्या आधारे कर्मचाऱ्यांची नवीन ठिकाणं बदली केली आहेत. महासंचालकांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शाळांना कळवले की, सध्या कोणतेही बदलीचे आदेश जारी केले जाणार नाहीत. आपण याला ग्राह्य धरू नये तसेच जर इतरत्र असे पत्र आले असल्यास ते पत्र अधिकृत नसेल.  या बनावट आदेशामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच दुसरीकडे असा आदेश केल्याची पुष्टी का केली नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.