'छावा'ने 'बाहुबली २' आणि 'पठाण' ला मागे सारत बॉक्स ऑफिसवर रचला नवा विक्रम!

    26-Feb-2025
Total Views | 72

chhaava surpasses baahubali 2 and pathaan to set a new box office record


 
मुंबई : अभिनेता विकी कौशलचा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत इतिहास रचला आहे. प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३३.१ कोटींची कमाई केली होती. यामुळे १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम आता ‘छावा’च्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गल्ली बॉय’च्या नावावर होता.
 
सध्या ‘छावा’चे शो संपूर्ण देशभरात हाऊसफुल सुरू आहेत. या चित्रपटाने विकी कौशलच्या कारकिर्दीला नवी उंची दिली आहे. ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा हा विकी कौशलचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ४४५ कोटींचा टप्पा गाठला आहे.
 
 
छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन – १२ दिवसांचे आकडे
पहिला आठवडा (१४ ते २१ फेब्रुवारी) – २२५.२८ कोटी
आठवा दिवस – २४.०३ कोटी
नववा दिवस – ४४.१० कोटी
दहावा दिवस – ४१.१ कोटी
अकरावा दिवस – १९.१० कोटी
बारावा दिवस – १९.२३ कोटी
एकूण कलेक्शन – ३७२.८४ कोटी

 
छावा ने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला!
बाराव्या दिवशीच्या कलेक्शनच्या बाबतीत छावा चित्रपटाने ‘बाहुबली २’ आणि ‘पठाण’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
 
 
१२ व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट (India Net Collection)
पुष्पा २ – १९.५० कोटी
छावा – १७.०० कोटी*
बाहुबली २ (हिंदी) – १५.७५ कोटी
पठाण – १४.८० कोटी
अ‍ॅनिमल – १२.३७ कोटी
सध्या कोणतीही मोठी स्पर्धा नसल्यामुळे छावा च्या कमाईचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121