अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी ४५ कोटी रुपये भरा, ग्रीनकार्डची जागा घेणार गोल्ड कार्ड!

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

    26-Feb-2025
Total Views | 22
 
Donald trump
 
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत परदेशातून आलेल्यांना ५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय ४५ कोटी रुपये) देऊन विशेष गोल्ड कार्ड मिळवून ते अमेरिकेचे नागरिकत्व मिळवू शकतात. गोल्ड कार्ड हे ग्रीन गार्डचेच प्रीमियम व्हर्जन आहे.
 
ओव्हल ऑफिसमध्ये वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्यासोबत कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले की, तुमच्याकडे जे कार्ड आहे त्याची जागा गोल्ड कार्ड घेणार आहे. या कार्डची किंमत सुमारे ५ दशलक्ष आहे. ग्रीन कार्डच्या सर्व वैशिष्ट्यांसह काही अतिरिक्त सुविधा देण्यात येतील. त्यानंतर ही योजना पुढील दोन आठवड्यांमध्ये सुरू होईल.
 
यामुळे जगभरातील श्रीमंत लोक आपल्या देशात येतील. ते लोक कर भरतील. त्यामुळे आपल्या देशाच्या अर्थकारणात भर निर्माण होईल. तसेच त्यामुळे रोजगार निर्मिती होण्यास लाभही होईल, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
 
ट्रम्पच्या गोल्ड कार्डच्या व्हिसामध्ये भारतीयांसाठी कोणताही अनुशेष नसल्याचे सांगितले आहे. मिळणारे नागरित्व हे तात्काळ मिळू शकते. भारतातील सर्वात श्रीमंतांसाठी ट्रम्पचा गोल्ड कार्ड व्हिसा गेंम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंतवणूकदार व्हिसा किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या H-1B ते ग्रीन कार्ड प्रक्रियेच्या तुलनेत अमेरिकेत राहण्यासाठीचा मार्ग खूपच जलद आणि सोपा असणार आहे.
 
पण भारतीय ४५ कोटी रुपये भरणाऱ्यांनाच गोल्ड कार्ड मिळू शकते. मात्र भारतातील अतिश्रीमंत व्यक्तीलाच हे गोल्ड कार्ड मिळेल. कारण अतिसामान्यांना ४५ कोटी रक्कम भरणे तोंडच्या गोष्टी नाहीत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121