नागा साधू पोहोचले काशी नगरीत; बाबा विश्वनाथाच्या मंदिरात काय घडलं?

    26-Feb-2025
Total Views |

Nag Sadhu at Kashi Vishwanath to celebrate Mahashivratri

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Naga Sadhu Kashi Vishwanath) प्रयागराज येथे पौष पौर्णिमेपासून सुरु झालेल्या महाकुंभाचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या अमृत स्नानाने झाला. त्याचदरम्यान हजारो नागा साधू आणि तपस्वींनी काशी येथे बाबा विश्वनाथांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी हत्ती घोड्यावर स्वार होऊन, हातात गदा आणि त्रिशूळ घेऊन, अंगावर भस्म लावलेल्या नागा साधूंच्या शोभायात्रेने सर्व सनातनींचे मन मोहून गेले.

हे वाचलंत का? : ४६ वर्षांनी संभलच्या शिवमंदिरात असा योग आला...

काशीमध्ये सर्वप्रथम जुना आखाड्यातील नागा संन्यासी आणि महामंडलेश्वर यांनी बाबा विश्वनाथ यांची पूजा केली. मंगला आरतीनंतर बाबा विश्वनाथ यांचा श्रुंगार करण्यात आला. श्री काशी विश्वनाथ धाम विविध प्रकारच्या सुगंधी फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला होता. गेट क्रमांक ४ ते गंगा द्वारपर्यंत केलेली सुंदर सजावट पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दि. २७ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलवर बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.