अल्पवयीन युवतीला न्याय देतो आणि नोकरी देतो असे आश्वासन देत पोलीस कॉन्स्टेबलकडून शारीरिक शोषण

    26-Feb-2025
Total Views |

बंगळुरू
 
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार केलेल्या आरोपाखाली एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. पीडित महिलेसोबत ही घटना घडली असून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबललाही अटक करण्यात आली आहे.
 
१७ वर्षीय पीडितेवर बलात्कार केलेल्या आरोपाखाली एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. पीडित महिला पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आणि मदत मिळवण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.
 
त्यांनी सांगितले की, या प्रकरणात बोमनहल्ली पोलिसांनी एका कॉन्स्टेबलसह दोन आरोपींना अटक करण्यात आली. संबंधित आरोपींना बोम्मनहल्ली पोलीस ठाण्यातील तुरूंगात अटक करण्यात आली आहे.
 
पीडितेच्या आईने या प्रकरणाची तक्रार मोहम्मनहल्ली पोलिसांकडे दाखल केली होती. मायको लेआउट पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध पोक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
अल्पवयीन पीडिता बोम्मनहल्ली पोलीस ठाणे परिसरात वास्तव्यास आहे. पीडितेची ओळख विकी नावाच्या विवाहीत पुरूषासोबत झाली. तो तिच्या शेजारी वास्तव्य करत होता. यानंतर आता आरोपी विकीने अल्पवयीन मुलीला विवाहाचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला मारहाणही करण्यात आली.
 
हे प्रकरण समोर येताच आईने बोम्मनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर कॉन्स्टेबल पोलीस हवालदाराने क्रूर वर्तन केले. पीडितेला न्याय देतो तसेच नोकरी मिळवून देता या बहाण्याने कॉन्स्टेबलने पीडितीचे शारीरिक शोषण केले. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आरोपी कॉन्स्टेबल अरुणने पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिला मादक पदार्थांचे सेवन करण्यास दिले. तसेच तिला मद्यही पाजण्यात आले. आरोपीने पीडितेवर बलात्कार करत घडलेला प्रसंग कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली.