शीखविरोधी दंगल काँग्रेस नेता सज्जन कुमारला जन्मठेप

    26-Feb-2025
Total Views |
 
sajjan kumar sikh riot
 
नवी दिल्ली : (Congress leader Sajjan Kumar) दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येच्या प्रकरणात काँग्रेसचा माजी खा. सज्जन कुमार यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या प्रकरणात काँग्रेसचे माजी खा. सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
 
शीख समुदायातील काही सदस्यांनी सज्जन कुमारला मृत्युदंड देण्याची मागणी केली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले होते. हे प्रकरण दि. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार भागात दोन शीख नागरिक जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित आहे. या काळात शिखांची कत्तल करण्यात आली आणि त्यांची घरे जाळण्यात आली.