Chhaava Box Office collection day 11: विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक गल्ला जमवणारा हिंदी सिनेमा!

    25-Feb-2025
Total Views |




chaava movie box office collection day 11
मुंबई : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा या ऐतिहासिक अॅक्शन ड्रामाने बॉलीवूडमध्ये नव्या विक्रमांची नोंद केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. चित्रपटाने जागतिक स्तरावर जवळपास ४५० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे.

११व्या दिवशीही दमदार कमाई

चित्रपटाने भारतात आतापर्यंत ३४४.९७ कोटींची कमाई केली आहे. सोमवारी त्याने १८.२२ कोटी गल्ला जमवला. जरी रविवारी कमावलेल्या ४० कोटींपेक्षा ही कमाई ५४.४५ कमी असली, तरी दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने जोरदार कामगिरी केली. या आठवड्याच्या शेवटपर्यंत त्याची ८४ कोटींची कमाई झाली आहे.
 
बजेटच्या तिप्पट कमाई!

फक्त १३० कोटीं मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने इतर मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. छावाच्या जागतिक कमाईने ४४४.५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०२५ मध्ये सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत तो अव्वल स्थानी असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संक्रांतिकी वास्थुनम या चित्रपटाच्या २५१.९५ कोटींच्या कमाईलाही तो मागे टाकत आहे.
 
प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद:

सोमवारी छावासाठी हिंदी मार्केटमध्ये एकूण २३.६४% प्रेक्षकसंख्या होती. सकाळच्या शोसाठी १३.३७% प्रतिसाद मिळाला, जो दुपारपर्यंत २१.५१%, संध्याकाळी २५.७८% आणि रात्री ३३.८८% पर्यंत वाढला.
 
विकी-रश्मिकासाठी मोठे यश:

छावा हा रश्मिका मंदान्नाच्या कारकिर्दीतील सलग चौथा ब्लॉकबस्टर ठरला आहे. याआधी तिने वारिसु (2023), अॅनिमल (२०२3), आणि पुष्पा २: द रुल (२०२४) यांसारखे गाजलेले चित्रपट दिले आहेत. विकी कौशलसाठीही हा चित्रपट एक मोठा टर्निंग पॉईंट ठरत आहे, कारण मागील काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
छावाच्या यशामुळे बॉलीवूडला पुन्हा ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाल्याचं स्पष्ट होत आहे.