टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट संघाला चारली पराभवाची धूळ, कोहलीची शतकीय कामगिरी आणि बाबरची हवा टाईट
कोहलीची शतकीय कामगिरी आणि बाबरची हवा टाईट
23-Feb-2025
Total Views |
संयुक्त अरब अमिरात : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॅफीत (Champions trophy 2025) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) यांचा सामना दुबईत दि : २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला. या सामन्यात सुरुवातीला पाकिस्तानने नाणेफेकी जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तान संघ २४१ धावांवर गारद झाला. दरम्यान टीम इंडियाला २४२ धावांचे आवाहन देण्यात आले.
सुरूवातीला पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आणि इमाल - उल- हकने चांगली सुरूवात केली होती. धावफलक हलता ठेवत बाबरने चांगली खेळी केली. २६ चेंडू खेळत पाच चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. त्यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज हार्दिक पांड्याने त्याला बाद केले. त्यानंतर इमाम - उल हकलाही म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. बाबरच्या जाण्याने इमामचा आत्मविश्वास ढासळला आणि २६ चेंडू खेळत १० धावांवर इमाम धावबाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी शतकीय भागीदारी केली.
An electrifying performance!!
Well played Team India.
You have made everyone proud by living up to the expectations of millions of cricket fans around the world.
मोहम्मद रिझवानने ७७ चेंडूत ४६ धावा केल्या. टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज अक्षर पटेलने रिझवानला त्रिफळाचित बाद केले. यानंतर पाकिस्तान संघाच्या फलंदाजांना आपली कामगिरी चोख पाडण्यात अपयश आले. सउद शकील, तय्यब ताहीर, सलमान, शाहीन आफ्रिदी, त्यानंतर एकेक करत संघच गारद झाला.
टीम इंडियाला ५० ओव्हरमध्ये एकूण २४२ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलमीवीर फलंदाजाच्या भूमिकेत होते. त्यावेळी सुरूवातीला चांगली सुरूवात झाली. रोहितने षटकारही ठोकला होता. मात्र, शाहीन आफ्रिदीने रोहितला १५ धावांवर त्रिफळाचित बाद केले. त्यानंतर अब्रार अहमदने शुबमन गिलला ४६ धावांवर बाद केले. यानंतर रन मशिन विराट कोहली आणि श्रेयश अय्यरने चांगली कामगिरी केली. त्यानंतर इमाम -उल हकने झेल घेत श्रेयश अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर विराट कोहली खेळपट्टीवर तळ ठोकून होता. त्याने १११ चेंडूत दमदार शतक ठोकले. अंतिम चेंडूवर त्याने चौकार मारत शतकीय कामगिरी करत पाकिस्तानचा सुपडासाफ केला.