डानिया खानने हिंदू धर्मात घरवापसी करत केला विवाह

    22-Feb-2025
Total Views |
 
Hinduism
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेलीतील रहिवासी असलेल्या डानिया खानने हिंदू धर्म (Hinduism) स्वीकारला आहे. हिंदू धर्माच्या चालीरितीने हिंदू युवतीशी विवाह करण्यात आला. डानिया म्हणते की, तिला हिंदू धर्माबाबत प्रेम असून तिला तो आवडतो. युवतीने याबाबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. प्रेम नगरातील रहिवासी असलेल्या दानियाने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, भविष्यात तिला काही झाल्यास तिचे पालक जबाबदार असतील. त्याने त्याच्या कुटुंबाला बेपत्त व्यक्तीचा अहवाल मागे घेण्यास सांगितले आहे.
 
५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता डानिया तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. त्यानंतर, तिचे वडील सुहेल रझा आणि कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतल्यानंतर प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. याबाबत डानिया म्हणते की, ती प्रौढ आहे. तिने स्वत:च्या इच्छेने घर सोडले. तिने याबाबत तीन व्हिडिओ अपलोड केले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
 
 
 
तक्रारीनंतर, पोलिसांची दोन पथकं डानिया आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, डानिया म्हणते की, मी हिंदू धर्मातर केले आहे. देवाच्या साक्षीने माझ्या प्रियकराशी मंदिरात विवाह केला, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिने तिच्या पालकांना शिव्या देणाऱ्यांवर टीका केली आहे.