छत्तीसगडमध्ये परदेशी निधीचा वापरत करत धर्मातराचा खेळ
22-Feb-2025
Total Views | 15
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदास साई यांनी अधिकाऱ्यांना राज्यात परदेशी निधी मिळवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीरपणे मदतीचा वापर धार्मिक धर्मांतरासोबत कामांसाठी केला जातो. धर्मांतरासारख्या अवैधपणे कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही संघटनेवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी स्वामी विवेकानंद विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत असताना साईने प्रतिपादन केले की, अनेक स्वयंसेवी संस्थांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी परदेशातून निधी मिळतो. परंतु असे आढळल्यास अशा निधींचा वापर आरोग्य आणि शिक्षणापेक्षा धर्मांतरावर जास्त करण्यात आला.
HUGE: Chhatisgarh's CM .@vishnudsai orders probe on FOREIGN FUNDING of all NGOs🔥 ~ 153 NGOs of Chhatisgarh are registered under FCRA, of which 53 have declared Christian Missionary roots.
CM said, NGOs take funding in the name of education and then do CONVERSION. Good move👌 pic.twitter.com/yKEca3E9kv
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) February 22, 2025
दरम्यान, गुरूवारी रात्री जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी छत्तीसगडमध्ये काम करणाऱ्या काही गैर-सरकारी संस्थांना होणाऱ्या निधीच्या गैरवापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ही परदेशी मदत धर्मांतरासारख्या अवैध कामांसाठी वापरली जाते. अशातच मुख्यमंत्री म्हणाले की, आपला देश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, अनेकदा जबरदस्ती, काही वस्तूंचे आमिष दाखवत धर्मांतर केले जाते. तेव्हा ते अनैतिक असून संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरुद्धही आहे.
अशातच एका अहवालानुसार, सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मांतरावर नवीन कायदे आणू शकते. दरम्यान राज्यात ११ धर्मांतराबाबच १३ एफआरआय नोंदवण्यात आले. त्यावेळी बस्तर विभागामध्ये २३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.