Chhaava Box Office Day 7: छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी, एका आठवड्यात तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई!

    21-Feb-2025
Total Views |


chhaava Box Office Day 7 detail report vicky kaushal film epic surpasses 200 crore
मुंबई : विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात २१९ कोटींचा टप्पा पार केला आहे. विकी कौशलसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.
 
छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन - दिवस ७
उद्योग निरीक्षक सॅकनिल्कच्या अहवालानुसार, छावा ने सातव्या दिवशी (लेखनाच्या वेळी) सुमारे ७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा दिवस संपेपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चित्रपटाचा भारतातील एकूण नेट कलेक्शन २०४ कोटींवर पोहोचला आहे.

छावा चित्रपटाने दमदार सुरुवात करत पहिल्याच दिवशी ३१ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी तब्बल ४८.५ कोटींची कमाई झाली. मात्र, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत किंचित घसरण झाली आणि तो दिवस २४ कोटी रुपयांवर स्थिरावला. पाचव्या दिवशी चित्रपटाने थोडी भरपाई करत २५.२५ कोटींचा गल्ला जमवला. सहाव्या दिवशी मात्र चित्रपटाने पुन्हा जोर पकडला आणि ३२ कोटींची कमाई केली, जी पाचव्या दिवसाच्या तुलनेत २६.७३ टक्के अधिक होती.


छावा चित्रपटाने सहाव्या  दिवशी ३२ कोटींची कमाई केली. सातव्या दिवसाची कमाई २१.५ कोटी इतकी केली असून एका आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात २१९ कोटींचा टप्पा पार केला असून या प्रभावी कमाईमुळे छावा विकी कौशलच्या सर्वाधिक गल्ला कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने (हिंदी नेट कलेक्शन) २४४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती, आणि छावा लवकरच हा विक्रम मोडीत काढू शकतो.