हिंदू युवतींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींवर वकिलांचा रोष

राजस्थानातील बेवर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    21-Feb-2025
Total Views |
 
 Hindu
 
जयपूर : राजस्थानातील बेवर जिल्ह्यातील बिजाई नगर पोलीस ठाणे परिसरामध्ये एका खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलींना मोबाईल फोनचे आमिष दाखवत आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत फसवल्याची घटना घडली. या प्रकरणात. मंगळवारी अजमेरमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत न्यायालयात सहा आरोपींनी वकिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
पोलिसांनी आरोपींना न्यायालयाच्या आवारातून कसेबसे बाहेर काढण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीडित युवतीचा  नशिराबादच्या एसीजेएम न्यायालयात मॅजिस्ट्रेट सुमन गिठाने त्यांच्या समोर जबाब नोंदवला आहे.
 
 
 
उपअधीक्षक सज्जन सिंग यांच्यासह पीडितांचे कुटुंबीय आणि संतप्त हिंदू संघटनेचे अधिकारीही नशिराबाद न्यायालयाच्या आवारात पोहोचले होते. या प्रकरणाची एकूण परिस्थिती लक्षात घेता. त्यांना पाचारण करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आवारात जमलेल्या जमावाने आरोपींवर कारवाईची कठोर मागणी केली.
 
या प्रकरणात आता पोलिसांनी पहिल्यांदाच आरोपींना घेऊन १८ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयात पोहोचले. तेव्हा पोक्सो कोर्टात वकिलांनी संताप व्यक्त केला. अशातच आता शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी आरोपीला पाहताच वकिलांच्याप्रति रोष निर्माण झाला. 
 
या प्रकरणी आता वकिलांनी एसपींची भेट घेतली होती. वकिलांनी एसपी राणा यांना एएसआय भीम सिंह यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली. आरोपींना न्यायालयात आणताना एएसआय भीम सिंह यांनी अपशब्द वापरल्याची माहिती समोर आली.