दिल्लीच्या नवनिर्विचीत मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोण आहेत? मुख्यमंत्री पदाच्या दावेदार ठरण्यामागे 'या' बाबी कारणीभूत

मुख्यमंत्री पदाच्या दावेदार ठरण्यामागे "या" बाबी कारणीभूत

    20-Feb-2025
Total Views |
 
Rekha Gupta
नवी दिल्ली (Rekha Gupta) : नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. भाजपने दिल्लीत जोरदार मुसंडी मारत ४८ जागांवर विजय मिळवला. काही मुस्लिमबहुल मतदारसंघातही भगवा फडकवण्यात भाजपला यश आलंय. निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी द्यायची, यावर गेली १०-१२ दिवस विचारमंथन सुरु होतं. अशातच रेखा गुप्ता या भाजपच्या महिला आमदाराची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करणाऱ्या भाजपच्या आमदार रेखा गुप्ता जिंदाल यांची दिल्ली मुख्यमंत्रीपदी बुधवारी निवड झाली. दिल्ली विधानसभा निव़डणुकीत शालीमारबाग मतदारसंघातून त्या आमदार आहेत. त्यांनी आपच्या वंदनाकुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला. रेखा गुप्ता या भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
 
अशातच त्यांनी २० फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती दर्शवली. रेखा या एलएलबी पदवीधर आहेत. त्यांचा जन्म १९४७ साली रोजी हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावात झाला. त्यांचे वडील हे स्टेटट बँक ऑफ इंडियात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. रेखा यांचे वय दोन वर्षे होते तेव्हापासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य होते. रेखा यांची जडणघडण ही दिल्लीत झाली. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.
 
दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं. रेखा यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतलं. रेखा यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर दक्षिण दिल्ली नगर परिषदेत महापौर म्हणून निवडून आल्या. आज त्या दिल्ली विधानसभा मतदारसंघाच्या चौथ्या मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या महिला मुख्यमंत्रीपदी रेखा यांना संधी देण्यामागे काही कारणं आहेत,
 
मुख्यमंत्री पदाच्या कारणांसाठी 'या' बाबी कारणीभूत
 
त्यातील पहिलं कारण म्हणजे रेखा यांची नसलेली राजकीय य पार्श्वभूमी हे त्यातील महत्त्वाचं कारण.
 
दुसरं कारण म्हणजे रेखा या युवा असल्याने युवा पिढीला संधी देणं हे भाजपचे मुख्य कारणय. हेच भाजपसाठी येणाऱ्या काळासाठी अनुकूल असल्याचे बोलले जाते.
 
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड करून संघटनांना बळ मिळेल, हे त्यापैकी एक कारण आहे.
 
अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्या काळापासून त्या दिल्ली भाजप पक्षाच्या ओळख आहे.
 
आम आदमी पक्षाची सर्वच पालंमूळ मोडीत काढून, दिल्लीकरांना विश्वासात घेत दिल्लीत भाजप निवडून येण्यामागे त्यांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे.
 
दरम्यान रेखा गुप्तांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. २०१५ मध्ये वंदना कुमारी यांनी सुमारे ११००० मतांनी रेखा गुप्ता त्यांचा पराभव केला. तर २०२० मध्ये त्यांचा पराभवाचे अंतर ३ हजार ४४० इतके होते. आता २०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव करण्यात आला. रेखा गुप्तांनी मागील पराभवाची परतफे़ड केली असं म्हटलं तरीही वावगे ठरणार नाही.
 
शीशमहल होणार संग्रहालय!
 
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केलीय. महिला दिनादिवशीच महिलांच्या बँक खात्याच अडीच हजार अर्थिक मदत करण्यात येणार अशी घोषणा केलीय. त्यानंतर अरविंद केजरीवालांनी भ्रष्टाचार करत बांधलेल्या शीशमहालात न राहता. त्याचे संग्रहालय निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या या घोषणेचं कौतुक होत आहे.