हरियाणात गोरक्षकांवर गोळीबार करत हल्ला

तस्कऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

    19-Feb-2025
Total Views |
 
 गोमाता
 
चंदीगड : हरियाणात फरिदाबादामध्ये गो तस्करी करणाऱ्यांकडून गोरक्षकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या एका वाहनाचा पाठलाग गोरक्षक करत होते. यावेळी तस्कर हे मथूराहून मेवातला गोमाता घेऊन जात होते. यावेळी केएमपी महामार्गावर गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
 
गोवंशी तस्करांनी गोरक्षकांवर गोळीबार केला. गोरक्षक गायींना वाचवण्यासाठी एका वाहनाचा पाठलाग करत होते. तस्करी मथुराहून मेवातला गुरे घेऊन जात असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी एएमपी महामार्गावर गोरक्षकांनी गो तस्करांचा पाठलाग केला.
 
यावेळी गो तस्करांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला करत गुरांनी भरलेले वाहन मागे सोडले आणि घटनास्थळावरून निघून गेले. यावेळी ४ गायी मृतावस्थेमध्ये आढळ्याचे दिसून आले. याशिवाय इतर अनेक गुरांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.
 
नाविलाजाने गो तस्करांना पकडता आले नसल्याचे सांगत या प्रकरणी गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. गायींना वाचल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत पाठवण्यात आले होते. 
 
दरम्यान, याआधीही अनेकदा काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी गोतस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरोधात देशातील राज्यांमध्ये गुन्हे दाखल केले असल्याचे बोलले जात आहे. गोतस्करी सर्वात अधिक द.भारतात होत असल्याच्या घटना सऱ्हास घडत आहेत.  आता ही घटना हरियाणामध्ये घडली.