राहुल गांधींची महाराजांचा अपमान करण्यापर्यंत मजल! महाराष्ट्राची माफी मागावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    19-Feb-2025
Total Views | 53
 
Shinde
 
मुंबई : राहुल गांधीची मजल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत गेली असून हे निंदाजनक आहे. त्यांनी माफी मागावी, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी दिली.
 
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "एकीकडे देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत असताना दुसरीकडे, राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केला आहे. जयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच शिवाय महाराष्ट्रातील शिवभक्तांचाही अपमान आहे. ही सगळी वक्तव्ये जाणीवपूर्वक होत असतात. महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा त्यांचा हेतू आहे. वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांची मजल आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत गेली. हे चुकून झालेले नाही. हे निंदाजनक वक्तव्य असून राहुल गांधींनी याबद्दल माफी मागायला हवी," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - छत्रपती शिवरायांचे किल्ले अतिक्रमण मुक्त होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन  
 
सिडकोच्या माध्यमातून लोकांना उत्तम घरे
 
"सिडको अतिशय उत्तम गुणवत्तेची घरे तयार करत असून नागरिकांना ही घरे परवडणाऱ्या किमतीत मिळत आहेत. यामध्ये आज २१ हजार लोकांना घरे मिळाली आहेत. म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरी प्रक्रियेत पारदर्शकता असून लोकांच्या समोरच लॉटरीची सोडत काढली आहे. त्यामुळे लोकांना चांगल्या गुणवत्तेची घरे मिळाली आहेत. ज्यांना घरे मिळाली त्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी नाही मिळाली त्यांच्यासाठी आम्ही पुढच्या तीन आठवड्यात पुन्हा लॉटरी काढणार आहोत. गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून हाऊसिंगचे नवीन धोरण आम्ही आणत आहोत. यामध्ये परवडणारी भाड्याची घरे, वर्किंग वुमेन हॉस्टेल, विद्यार्थी होस्टेल, जेष्ठ नागरिक, गिरणी कामगार, पोलिस यांच्यासाठी घरे तसेच मुंबईतील डबेवाल्यांसाठी घरे या सगळ्याचा अंतर्भाव असलेले नवीन धोरण आम्ही तयार करत आहोत. यात क्लस्टर डेव्हलपमेंट ही एक नवीन पॉलिसी आम्ही आणणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचा सप्लाय सुरु होईल आणि लोकांना परवडणारी घरे मिळतील," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121