स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीआधी ठाकरेंना धक्का! पाच नगरसेवक 'जय महाराष्ट्र' करणार

    18-Feb-2025
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : कोकणात उबाठा गटाला गळती सुरु असतानाच आता पुन्हा एकदा दापोलीतील पाच नगरसेवक उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करणार असल्याची माहीती आहे. दरम्यान, या पाचही नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
रत्नागिरी आणि दापोली नगर पंचायतीमधील ‘उबाठा’ गटाच्या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. हे पाचही नगरसेवक मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केला होता.
 
हे वाचलंत का? -  सुप्रिया सुळे संतोष देशमुख कुटुंबाच्या भेटीला! म्हणाल्या, "ही लढाई महिलांनी..."
 
विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर अशी या नगरसेवकांची नावे आहेत. सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देत कागदपत्रांची पूर्तता केली आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
 
दरम्यान, नुकताच उबाठा गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उबाठा गटाला एकामागून एक धक्के बसणार असून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.