लाडक्या बहिणींनो नवा नियम लागू झाला! 'हे' कराल तरच येतील पैसे!

    17-Feb-2025
Total Views | 54
 
Ladki Bahin Yojana
 
 
मुंबई : (Ladki Bahin Yojana update e- KYC) राज्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत दर महिन्याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी मह्त्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता प्रत्येक वर्षी ई - केवायसी करावी लागणार आहे.
 
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थींना दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बदललेल्या निकषानुसार, लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक वर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान केली जाणार आहे. यामुळे महिलांच्या अर्जाची योग्य तपासणी केली जाईल आणि त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेण्यास मदत होणार आहे.
 
लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. अद्याप ११ लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी बाकी आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121