सपा नेत्याने सोडली लाज, योगी आदित्यनाथ सरकारबाबत केलं अश्लील वक्तव्य

लखनऊ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    15-Feb-2025
Total Views |
 
Yogi Adityanath
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊ पोलिसांनी एका समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. ते दुसरे तिसरे कोणीही नसून सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समाजमाध्यमाचे प्रभारी मनीष जगन अग्रवाल आहेत. शांतता भंग होण्याच्या भितीने लखनऊ पोलिसांनी त्यांना शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले.
 
त्यांनी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत तसेच चिथावणीखोर पोस्ट करत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केल्याने गजाआड आहेत. त्याच्या वैयक्तीत सोशल मीडियावरून त्याने अनेकदा अश्लील कमेंट केल्या आहेत.
 
 
 
या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, सपा नेता मनीष अग्रवाल हा ब्लडप्रेशरचा रुग्ण आहे. तसेच त्याची पत्नी ही गर्भवती असून त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला काही झाल्यास लखनऊ त्याची जबाबदार घेतील. यावर उत्तरताना लखनऊ पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टद्वारे समाजामध्ये सतत अशांतता आणि हिंसाचार निर्माण केल्याने कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
 
याचपार्श्वभूमीवर आता सपा नेत्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला. पोलीसांचा कडक बंदोबस्त करत कार्यालयाबाहेर अनेक सपा नेते तैनात झाले. यावेळी पोलिसांनी बॅरिकेडही लावले होते. यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव, मंत्री शिवपाल सिंह यादव, सपा मुंबई अध्यक्ष अबू आझमीही त्या ठिकाणी उपस्थित होते.