शाही जामा मशिदीच्या हिंसाचारात फरार कट्टरपंथींना पकडल्यास मिळणार बक्षीस

मशिदीच्या भिंतींवर कट्टरपंथीचे लावण्यात आले पोस्टर्स

    15-Feb-2025
Total Views |
 
Shahi Jama Masjid
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यामध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये हिंसाचारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आता संभल पोलिसांनी ७४ गुन्हेगारांचे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर्स जामा मशिदीच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. या कट्टरपंथींची ओळख पटवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बक्षीस जाहीर केले.
 
संभलचे पोलीस २४ नोव्हेंबर रोजी संभलमध्ये घडलेल्या हिंसक घटनेशी संबंधित ७४ गुन्हेगारांची ओळख पटवण्यात आली. सीसीटीव्हीद्वारे त्याचा या घटनेमध्ये सहभाग आढळून आला, त्याची ओळख पटावी म्हणून त्याते पोस्टर्सही लावण्यात आले आहेत.
पोस्टर्समध्ये दिसणारे ओळखून त्याची माहिती द्या, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अशातच त्यांनी लोकांना हे फोटो ओळखण्याचे आणि जर त्यांना या गुन्हेगारांबाबत कसलीही माहिती असल्यास या प्रकरणाची माहिती पोलिसांनी द्यावी. 
 
 
 
दरम्यान, संबंधित माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. संभल हिंसाचारासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाने आणि संभल पोलिसांनी घटनास्थळी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून इतर आरोपींची ओळख पटवण्यात आली होती. परंतु काही दंगलखोर कट्टरपंथी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले.