राजीव गांधी फाउंडेशन-सॅम पित्रोदा यांना USAID कडून आर्थिक मदत!

भाजप खासदाराचा दावा, प्रश्नांचा पाढाच वाचून दाखवला

    13-Feb-2025
Total Views |

USAID
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID वर बंदी घातली. मात्र तेव्हापासून यासंबंधित गैरकृत्याचे प्रकरण समोर येऊ लागले आहे. १० फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेमध्ये USAID कडून भारताविरोधात असलेल्या शक्तींना मिळणाऱ्या निधीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच यासंबंधित प्रश्नही उपस्थित केले आहेत.
 
सोशल मीडियाच्या ट्विटर हँडेलवर पोस्ट शेअर करत त्यांनी नमूद केले की, स्वातंत्र्यापासून काँग्रेसने फक्त देशात उभी फूट पाडली आहे. राजीव गांधी फाउंडेशनसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी यूएसएआयकडून पैसे घेतले आणि देशद्रोही घटकांना फायदा करुन दिला. विरोधी पक्ष देशात उभी फूट पाडत तेढ निर्माण झाला.
 
 
 
भाजप आमदाराने प्रश्नांचा पाढा वाचला 
 
भारतात फूट पाडण्यासाठी USAID ने ओपन सोसायटी फाउंडेशनच्या जॉर्ज सोरोस यांना ५ हजार कोटी रुपये दिले होते की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.
 
तसेच यूएसएआयडीने राजीव गांधी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टला पैसे दिले होते की नाही? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
यूएसएआयडीने ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांना पैसे दिले की नाही?
 
बांगलादेशातील लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या मोहम्मद युनूसशी गांधी कुटुंबासोबत नेमका कसा काय संबंध?
 
राजीव गांधी फाउंडेशनसाठी यूएसएआयडीने राजीव गांधी फाउंडेशनला विजय महाजन यांच्या संस्थेला पैसे दिले की नाहीत?
 
देशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेसने त्यांना राजीव गांधी फाउंडेशनमध्ये ठेवण्यात आले होते की नाही?
 
जातीय जनगणनेबद्दल बोलणाऱ्या ग्रामीण विकास न्यासाला अमेरिका पैसे देते की नाही?
 
यूएसएआयडीने तालिबानला आर्थिक मदत केली होती की नाही?
 
नेपाळच्या नास्तिक चळवळीला यूएसएआयडीने आर्थिक बार लावला होता का नाही?, असे इतरही प्रश्न करण्यात आले.